वाठार स्टेशन दि,३ :- प्रतिनिधी ------ अंबवडे संमत वाघोली येथील स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्स मधील एकूण ५ दुकानाची अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केल्याची घटना उघडकीस आली.
वाठार स्टेशन पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार अंबवडे संमत वाघोली येथील चौकात असणाऱ्या एकूण ६ दुकानात मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ६ दुकानांची शटर्स उचकटून आत प्रवेश केला व साडीच्या दुकानातून कपडे जीन्स टी-शर्ट नाईट पॅन्ट जॅकेट तसेच चप्पलच्या दुकानातून वेगवेगळ्या कंपनीचे ६ शूज,चप्पल व मोबाईलच्या दुकानातून मनगटी घड्याळे, हेडफोन्स, ब्लूटूथ, स्पीकर, पावर बँक या तिन्ही दुकानातून मिळून एकूण ३८ हजार रुपयेचा मुद्देमाल व इतर तीन दुकानातून १० हजार ३०० रुपयांची रोकड तसेच मुद्देमाल व रोकड मिळून एकूण ४८ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याची तक्रार कापड दुकानाचे मालक चैतन्य दिलीप शिंदे यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिली असून वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्निल घोंगडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे पुढील तपास पोलिस करीत आहेत.
कोरेगाव चे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी अंबवडे संमत वाघोली येथील चोरी झालेल्या दुकानांची पाहणी केली.
फोटो खालील ओळ :- अंबवडे संमत वाघोली येथील स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्समधील दुकानांचे शटर्स उचकटून अज्ञात चोरट्यांनी केलेली चोरी.
0 Comments