Hot Posts

6/recent/ticker-posts

धामणेर ता. कोरेगांव 2018-19 मध्ये जिल्हा सुंदर गांव



सत्य सह्यादी \सातारा 

आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत  सातारा जिल्ह्यातील धामणेर ता. कोरेगांव या ग्रामपंचायतीस सन 2018-19 मधील “जिल्हा सुंदर गांव” म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर सन  2019-20 मधील “तालुका सुंदर गाव” म्हणून अपशिंगे (मि.) ता. सातारा, शिरंबे ता. कोरेगांव, नागनाथवाडी ता. खटाव, गोंदवले खुर्द ता. माण, काळज ता. फलटण, गुठाळवाडी ता. खंडाळा, चांदवडी पुनर्वसन ता. वाई, चोरांबे ता. जावली, मांघर ता. महाबळेश्वर, गमेवाडी ता. कराड व मान्याचीवाडी ता. पाटण  या  11 ग्रामपंचायतींना घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.

                या पुरस्काराचे वितरण गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी  11 वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही श्री. फडतरे यांनी दिली.

                                                                                                0000

Post a Comment

0 Comments