Ticker

6/recent/ticker-posts

पर्यंती ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषराव नरळे यांचे वर्चस्व सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क कुकुडवाडः माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात चर्चेत असलेल्या पर्यंती ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषराव नरळे यांनी गेल्या 25 वर्षाची सत्ता अबाधीत ठेवत ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात घेतली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, माण तालुक्यातील पर्यंती हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषराव नरळे यांच्या नावाने ओळखले जाते. गेले 25 वर्षांपासून सुभाषराव नरळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचयतीचा कारभार सुरू आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पर्यंती ग्रामपंचायत विरोधी पक्षाच्या ताब्यात गेल्याची बातमी प्रसिद्ध झाल्या होत्या. हा सुभाषराव नरळे गटाला धक्का मानला जात होता. मात्र, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषराव नरळे यांनी सरपंच, उपसरपंच निवडीत चमत्कार घडवला असून ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात घेतली आहे. सरपंचपदी संतोष छगन नरळे, उपसरपंच पदी तयाप्पा कुंडलिक सरतापे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून उल्का दादा कळेल, अमृता प्रवीण नरळे, कुसुदा शंकर गेंड यांची सन्मानीय निवड झाली आहे. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर बोलताना सुभाषराव नरळे यांनी सांगितले की, गावाचा विकास हा ग्रामपंचयतीचा मुख्य उद्देश असतो तो सवार्ंना बरोबर घेऊन पार पाडू. सामान्य लोकांना सत्तेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी गोपीचंद नरळे, सचिन नरळे, ज्ञानदेव बाड, बालाजी नरळे, विकास नवत्रे, अशोक नरळे, मच्छिद्र शिंदे, वसंत कळेल, विजय नवत्रे, प्रवीण नरळे, गंगाराम नरळे, संग्राम नरळे, अण्णा साळवे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. नूतन पदाधिकारी यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, डॉ. संदिप पोळ, युवा नेते मनोज पोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत, युवक अध्यक्ष बाळासाहेब काळे, म्हसवड शहर अध्यक्ष युवराज सूर्यवंशी इ.लोकांनी अभिनंदन केले. भाजपचा करेक्ट कार्यक्रम पर्यंती ग्रामपंचायत प्रतिष्ठेचा विषय झाला होता. सुभाषराव नरळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 25 वर्षाची सत्ता अबाधीत ठेवत विरोधी भारतीय जनता पार्टीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची एकच चर्चा तालुकभर सुरू होती. तर अनेकांनी समक्ष व दूरध्वनीवरून सुभाषराव नरळे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments