Hot Posts

6/recent/ticker-posts

साताऱ्यातून अल्पवयीन युवतीचे अपहरण


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा 
येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्यास असणाऱ्या युवतीचे दि.7 रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पीडित युवतीच्या वडीलांनी तक्रार दिली आहे. 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन युवती साताऱ्यातील एका महाविद्यालयात सायन्स विभागात शिकण्यास आहे. ती त्याच महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहण्यास आहे. दि.7 रोजी तिच्या वडीलांनी तिच्या मोबाइलवर फोन केला असता तिने फोन उचलला नाही. त्यामुळे तिच्या वडीलांनी तीच्या मैत्रिणीला फोन करून तिच्याबाबत विचारणा केली. त्यानंतर तिने वसतीगृहात सुट्टीचा अर्ज दिला असून ती घरी गेली असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने पीडितेच्या वडीलांना दिल्याने त्यांनी वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ती सकळी साडेआकरा वाजता निघून गेल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पीडितेच्या वडीलांनी नातेवाइकांच्याकडे चौकशी केली असता ती कुणाकडेच गेली नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी तीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास फौजदार रोकडे करत आहेत. 

तक्रार घेण्यासाठी पोलिसांकडून विलंब 

पीडित युवतीचे नातेवाइक हे सोमवारी सकाळी अकरा वाजता तक्रार देण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, सातारा शहर पोलिसांकडून त्यांची तक्रार घेण्यास विलंब करण्यात येत होता. याबाबत पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू तो झाला नाही. त्यामुळे वैतागलेल्या नातेवाइकांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शहर पोलिसांच्याकडून तक्रार दाखल करून घेण्यास सुरूवात करण्यात आली. वरिष्ठांनी फोन केल्यामुळे वैतागलेल्या फौजदार रोकडे यांनी ""मला कोणाचा दबाव आणायचा नाही'', असे म्हणून तक्रारदारांच्यावर राग काढला.

Post a Comment

0 Comments