दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा ः अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरण कामाची प्रक्रिया तत्काळ सुरू करून बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर काम करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. नुकतीच दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी राज्यातील रस्ते कामांच्या मागणीचे निवेदनही गडकरींना दिले.
याबाबत गडकरी यांनी शेंद्रे-कागल महामार्गाच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना तत्काळ निविदा काढण्याच्या सूचना दिल्या.
सातारा जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आणि पुणे-सातारा या महामार्गाच्या रखडलेल्या विविध कामांबाबत उदयनराजेंनी गडकरींची भेट घेतली. या भेटीत सातारा जिल्ह्याच्या विकासातील महत्वाचा टप्पा असलेल्या रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम कसे होईल, तसेच जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्गाला जोडणारे जिल्ह्यांतर्गत रस्ते मजबूत करून पायाभूत सुविधा वाढवण्यावर आपला भर आहे. त्यासाठी केंद्राच्या माध्यमातून आवश्यक तो निधी मिळवण्याबाबत गडकरी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

0 Comments