Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील तीन टोळ्यांवर मोक्का



अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचा ट्रिपल धमाका

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: सातारा, कोरेगाव व वाई तालुक्यात आपल्या गुन्हेगारी कारवायांनी उच्छाद मांडणार्‍या तीन टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. बन्सल यांच्या ट्रिपल धमाक्यामुळे गुन्हेगारी वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार, (रा. 209, रविवारपेठ, सातारा) निखील प्रकाश वाघमळे (रा. अंबवडे ता. कोरेगाव) व   अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईज, ता. वाई) अशी या तीन टोळीप्रमुखांची नावे आहेत. 

बन्सल यांनी  अधीक्षकपदाचा  कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी  जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी यांची बैठक घेवून सुपारी घेऊन खून, खून करण्यासाठी अपरहण करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी असे आर्थिक फायद्याकरीता संघटितपणे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अन्वये प्रभावी

कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.  .

सातारच्या टोळीत तिघेजण

सातार्‍यातील टोळी प्रमुख अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार याने व त्याचे 2 साथीदार यांनी किन्हई गावचे हद्दीत फिर्यादी यांनी वाळू काढण्यासाठी मजूर पुरवावेत या कारणाकरीता जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने देशी बनावटीच्या पिस्टलमधून कानाशेजारी 1 राऊंड फायर केल्याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये एकुण 3 आरोपी असून अक्षय पवारला अटक करण्यात आलेली आहे व उर्वरीत 2 अटक करणे बाकी आहे. गुन्ह्यातील पिस्टल जप्त करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा प्रस्ताव  कोरेगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे  यांनी पाठविला असून तपास सातारा ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे करीत आहेत. दरम्यान, या टोळीवर एकुण -21 गुन्हे दाखल असून मोक्का प्रस्ताव मंजुरीस पाठविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक संतोष साळुंखे, हवालदार प्रवीण शिंदे,  पोलीस नाईक अमोल सपकाळ यांनी परिश्रम घेतले. परिक्षम घेतले आहेत.

वाघमळे टोळीवर सहा गुन्हे 

टोळी प्रमुख निखील प्रकाश वाघमळे व त्याचे इतर 5 साथीदार यांनी फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक सातारा वाढे फाटा मार्गे लोणंद बाजूकडे जात असताना पाटखळ, ता. जि. सातारा येथील हॉटेल शिदोरी समोर, आरोपींनी पाठीमागून इंडेवर गाडीतून येवून ट्रकला ओव्हरटेक करून, फिर्यादीचे ट्रकला गाडी आडवी मारली. ट्रक थांबवून, इंडेवर गाडीमधून खाली उतरुन, फिर्यादीने गाडी ठोकलेचा बहाणा करून, ट्रकच्या केबीनचे दार उघडून फिर्यादीस व क्लिनरला खाली ओढून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. प ट्रकचे ड्रॉव्हरमधील 8000 रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाणेस अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता.  यातील निखील प्रकाश वाघमळेला अटक करण्यात आली असून 1 विधीसंघर्षीत बालकाचा ताबा घेण्यात आलेला होता. तपासामध्ये दोन आरोपी

निष्पन्न झाले असून 2 अनोळखी आहेत. गुन्ह्याचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे  यांनी पाठवला असून श्रीमती आँचल दलाल, सहायक पोलीस अधीक्षक, सातारा सिटी विभाग सातारा या करीत आहेत. या टोळीवर एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे. 

मोक्का प्रस्ताव मंजुरीस पाठविण्याकरिता निरीक्षक धुमाळ यांच्यासह  एम. आर. फरांदे, पोलीस  प्रविण शिंदे, महेश शिंदे  यांनी परिक्षम घेतले आहेत.

जाधव टोळीने केला होता हॉटेल व्यावसायिक  युवकाचा खून

 टोळी प्रमुख अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव रा. भुईंज याने व त्याचे इतर 17 साथीदार असे एकुण 18 आरोपींनी  कट करुन आरोपी रोहन जाधव याच्या बहिणीस मयत ओंकार कैलास चव्हाण (वय- 30) रा. कृष्णा पुलाजवळ, आसले ता. वाई) हा त्रास देत असल्याचा राग मनात धरुन, चिडून जावून मयतास पाचवड येथील शेवाळे वस्तीजवळून, जबरदस्तीने मोटर सायकलवरुन पळवून नेले होते. त्यानंतर भुईंज  गावचे हद्दीत कृष्णानदी काठाजवळ आंब्याचे झाडाखाली नेऊन, त्यास कळकाच्या काठीने मारहाण करुन, त्याचे हातातील सोन्याची अंगठी व जवळ असलेला मोबाईल फोन जबरीने काढून घेत खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह भुईंजच्या सार्वजनिक स्मशान भुमीमध्ये जाळून प्रेताची राख नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट केला. तसेच साक्षीदारालाही शेडवर नेहून मृताप्रमाणे त्याला खोलीचे छताचे अँगलला दोरीने उलटे बांधून अमानुषपने काठयांनी व गुप्त भागावर मारहाण करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेपत्ता तक्रारीतील चौकशीमध्ये सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुन्ह्यामध्ये एकुण 9 आरोपींना अटक करण्यात आलेली असून उर्वरीत 9 आरोपी अटक करणे बाकी आहे. गुन्ह्याचा प्रस्ताव भुईंजचे पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पाठविला असून उपअधीक्षक डॉ.शितल जानवे-खराडे तपास करीत आहेत. या टोळीविरोधात एकूण 26 गुन्ह्यांची नोंद आहे. मोक्का प्रस्ताव मंजुरीस पाठविण्यासाठी किशोर धुमाळ यांच्यासह प्रविण शिंदे,  विकास गंगावणे यांनी परिक्षम घेतले आहेत.

Post a Comment

0 Comments