Hot Posts

6/recent/ticker-posts

गुटखा उत्पादकांवर मोका अंतर्गत कारवाई करा

 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा ः गुटखा उत्पादक व घाऊक विक्रेत्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी, सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्यात अवैध गुटखा उत्पादन व विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गोरगरीब टपरीधारकांनवर कारवाई होत आहे. वास्तविक गुटखा उत्पादक व घाऊक विक्रेत्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांना अटक करावी, तरच गुटखा विक्री थांबेल. इंधन दरवाढ व वाढीव वीज बिलामुळे जनता मेटाकुटीस आली असताना वीजबिल वसुलीचा तगादा वीज मंडळाने सुरू केला आहे. कोरोना काळात कोणतीही शाळा अथवा शिक्षण संस्था सुरू नसतानाही फी वसुलीसाठी संस्थाचालकांनी पालकांना व विद्यार्थ्यांना त्रास देणे सुरू केले आहे. या बाबी निदर्शनास आणून देत त्यावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हाध्यक्ष युवराज पवार तसेच राहुल शेळके, जितेंद्र वैराट, सौरभ झेंडे, दादा शिंगण, अश्विन गोळे, अमोल कांबळे, प्रशांत साळुंखे, अविष्कार पाटील, संजय गायकवाड, विश्वास सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, विशाल माने, राजेंद्र पवार, ओंकार पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments