उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर दिवसाढवळ्या सुरू असलेले दिवे
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: महाराष्ट्रात कोळश्याअभावी सहा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद पडले असून महाराष्ट्रात अंधार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने आठ तासाचे लोडशेडींग कधीही सुरू होण्याची शक्यता असताना फलटण शहरातील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयावरील दिवे भरदिवसा सुरू होते.
महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रात कोळश्याअभावी सहा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद पडले असताना राज्यात कधीही आठ तासांचे लोडशेडिंग सुरू होऊ शकते. एकिकडे महाराष्ट्र शासनाची वीजनिर्मिती करीता धडपड सुरू असताना फलटणमधील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यालयाच्या इमारतीच्या बाहेरील दिवे दिवसाही सुरू असल्याने उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या महाराष्ट्रावर वीज संकट असताना कोणत्याही वीज बचत करण्याबाबत गांभीर्य दिसून येत नाही.फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात कधी वीज येते तर कधी वीज जाते हे शेतकऱ्यांना देखील कळत नाही. शेतकऱ्यांची उभी पिके वीजे अभावी जळून गेलेली दिसून येत आहेत शेतकऱ्यांना विजेची किंमत काय आहे हे कळत आहे परंतु उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विजेची किंमत नाही असे दिसून येत आहे.
फलटण तालुक्यातील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालय हे अनेक वेळा अनेक विषयांमुळे गाजलेले आहे व गाजतही आहे त्यातच रविवारी दिनांक 10 रोजी सुट्टी असतानाही कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडूनही दिवे भर दिवसा सुरू असल्याने ते बंद करण्याची तसदी घेतली नाही. येथील कर्मचारी कशात गुंग आहेत अशी चर्चा सध्या उप विभागीय भुमी अभिलेख परिसरात सुरू होती.भूमी अभिलेख कार्यालय हे शासकीय सुट्टीच्या दिवशी फक्त खास एजंट व खास लोकांसाठी सुरू असते की काय? एकंदरीतच या कार्यालयावर कोणाचेही नियंत्रण असल्याचे या आगोदर ही दिसले नाही आत्ताही दिसत नाही. फलटणचे नूतन उपविभागीय भुमी अभिलेख उपअधीक्षक सचिन पवार हे आता तरी कार्यालयातील सुरू असलेल्या बेजबाबदार कामकाजाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0 Comments