कराड:-
भोळेवाडी कराड येथे रेशनिंग दुकान वरती युनिट प्रमाणे धान्य मिळेल
नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी जनहित संघर्ष सेना यांच्याकडे केली
त्या अनुषंगाने जनहित संघर्ष सेनेचे अध्यक्ष मा. किशोर(भाऊ) साठे यांनी दखल
घेत मा. तहसीलदार कराड यांना निवेदन देऊन युनिट प्रमाणे धान्य मिळावे व
तसेच लोक डाऊन काळात मोफत शासनाने दिलेले धान्याची वाटप होत नसल्याबाबत ची
तक्रारही त्यांनी यावेळी केली.
तसेच जनहित
संघर्ष सेना महाराष्ट्र सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी अश्या रेशनिंग
दुकानदारांवर ती त्वरित कारवाई करण्याची मागणी केली तसेच अशा दुकानदारांचे
लायसन ही रद्द व्हावे यासाठी या निवेदन पत्राने तहसीलदार यांच्याकडे मागणी
केली यावेळी जनहित संघर्ष सेना सातारा जिल्हाध्यक्ष किशोर साठे यांनी
सांगितले की जर या दुकानदारांवर ती योग्य ती कारवाई करण्यात आले नाही तर
आम्ही जनहित संघर्ष सेनेच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे
उपोषणाला बसू व गोरगरिबांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शासनाचा
निषेध करू
यावेळी माननीय तहसीलदार कराड
यांना निवेदन देते वेळी सातारा जिल्हा अध्यक्ष जनहित संघर्ष सेना मा.किशोर
भाऊ साठे, जिल्हा संघटक विक्रांत साठे,तालुकाध्यक्ष रोहित कांबळे .कराड
दक्षिण तालुका अध्यक्ष .संतोष कटमणी तानाजी साठे .सातारा जिल्हा सरचिटणीस
राम भिसे, मंगेश साठे, विवेक वायदंडे, शंकर घस्ते, इत्यादी कार्यकर्ते
उपस्थित होते
0 Comments