सातारा
रयत
शिक्षण संस्थेचे खासगीकरण करणे म्हणजे रयतेला फुली मारण्यासारखे आणि एका
कुटुंबाला महत्व देण्यासारखे आहे. `रयत`मध्ये सत्तेचे केंद्रीकरण सुरू असून
वडाच्या झाडाचे केंद्रीकरण किंवा खासगीकरण झाले तर हा वटवृक्ष वठणार आणि
त्याला वाळवी लागेल, असा इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला.
आज
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होण्याचा
घाट असल्याबद्दल उदयनराजेंनी मते मांडली. खासदार उदयनराजे म्हणाले की, असे
झाले तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल.
रयत शिक्षण संस्थेची घटना कर्मवारी अण्णांनी केली होती. त्याच्या आधारावर
संस्थेची स्थापना झाली होती. पण असे काहीतरी घडलंय की अण्णांच्या विचारांशी
फारकत घेण्यात आली आहे.
रयत
शिक्षण संस्थेच अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच हवे आहेत, असा मुद्दा
उपस्थित करून त्यांनी शरद पवारांच्या अध्यक्षपदाबद्दल आक्षेप घेतल्याचे
दिसून येत आहे. श्री. पवार हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते म्हणाले,
लोकांच्या प्रवाहाच्या विरोधाच्या दिशेने मतांची मांडणी करत असाल तर ती
चूकच आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ साली कर्मवीर अण्णांनी केली.
त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला असला तरी कर्मभूमी सातारा होती.
थोरले
प्रतापसिंह महाराजांनी यांनी सातारच्या राजवाड्यात त्या काळात पुरोगामी
विचार म्हणून मांडणी केली. राजवाड्यात त्यांनी शाळा सुरू केली. मुलांबरोबर
स्त्रीयांकरित सर्वात प्रथम शिक्षणाची दालने त्यांनी खुली केली. त्यातून
प्रेरणा घेऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पुढे
नेली. थोरले प्रतापसिंह महाराजांनी दिलेल्या विचारातून प्रेरणा घेऊन
आण्णांनी 'रयत'ची स्थापना केली. सर्वसामान्य कुटुंबातील कोणतेही मुलं
शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत. तोच विचार घेऊन अण्णांनी वाटचाल केली.
याविषयीची
एक आठवण सांगता उदयनराजे म्हणाले, मी लहान असताना कर्मवीर आण्णा आमची
आज्जी राजमाता सुमित्राराजे भोसले यांना भेटण्यासाठी येत असत. त्यांची
चर्चा काय होत होती मला माहित नाही. पण, सातारा राजघराण्याचे मोठे योगदान
रयतच्या स्थापनेत आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य असेल जमिनी असेल वाटेल ते
सहकार्य दिले. रयत शिक्षण संस्थेची घटना त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे
राजकारण या संस्थेत येऊ नये म्हणून यासंस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा
मुख्यमंत्री सत्ता कोणाची असो असावा, अशी सूचना त्यांनी केली.
जेणेकरून
शासनाचे शिक्षण धोरणातून फायदा सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना
व्हावा, ही त्या मागची मुलभूत कल्पना होती. `कमवा आणि शिका` ही योजना सुंदर
आहे. प्रत्येकाने शिक्षण घेत असताना कमवावे, हा पुरोगामी विचारच म्हणावा
लागेल. आज पाहिले तर ज्या ज्या लोकांचे योगदान आहे. ज्या लोकांना मेंबर
म्हणून कसे घेतले जाते हे मला माहिती नाही. अनेकांनी मला बोलून दाखविले की
आम्ही या संस्थेसाठी इतके झटलो आमच्या कुटुंबातील कोणी नाही. साधे आमच्या
कुटुंबाचे इतके मोठे योगदान असताना आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला रयत
शिक्षण संस्थेत सभासद म्हणून मान्यता दिलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त
केली.
0 Comments