Ticker

6/recent/ticker-posts

फलटणच्या राज घराण्याची जमीन बळकावत परस्पर विकली


 

फलटण 

 फलटण च्या राज घराण्याची जमीन संगनमताने नियमबाह्य पद्धतीने बळकावत कोट्यवधी रुपयांची मालमत्तेची कागदोपत्री परस्पर फेरफार करून विकल्याची माहिती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून त्यांनी केलेल्या आरोपामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी "जय व्हीला" या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार,  कोळकी ता. फलटण येथील जुना सर्वे नंबर 853 चालू सर्वे नंबर  20 ही संपूर्ण मिळकत मूळची श्रीमंत मालोजीराजे मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांची सदर मिळकत श्रीमंत मालोजीराजे मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे चिरंजीव श्रीमंत विक्रमसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे नावे हुकूम नंबर  243/31 जानेवारी 1955 ने सदरची मिळकत  फेरफार क्रमांक 5985 ने झाली आहे तद्नंतर सदरची मिळकत काही लोकांनी महसूल खात्याला हाताशी धरून वरील मिळकती मध्ये नाव लावून घेतले.

त्या नंतर त्या जमिनीस बनावट कुळ लावून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे संरक्षित कुळ नसताना 32 ग झाल्याचे भासवून सदरची मिळकत हस्तांतरण केली आहे परंतु सदरचा हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीर असून तो ट्रांसफर प्रॉपर्टी एक्ट 1882 कलम 54 प्रमाणे झालेले नसताना श्रीमंत विक्रमसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची टायटल पास झाली नसताना तसे झाल्याचे दाखवून सदर जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार केले आहे. सदर 44 मालमत्ता याप्रकारे हडपण्यात आल्या आहेत.फलटण च्या राज घराण्याची जमीन संगनमताने नियमबाह्य पद्धतीने बळकावली असून कोट्यवधी रुपयांची मालमत्तेची कागदोपत्री परस्पर फेरफार करून विकली आहे.

 यानंतर 6119 हा फेरफार बेकायदेशीर ठरल्याने रद्द झालेला फेरफार विभागीय आयुक्त पुणे यांनीही रद्द ठेवला त्यामुळे वरील मिळकत सातबारा सदरी पुन्हा मूळ मालक श्रीमंत विक्रमसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे नाव येणे क्रमप्राप्त झाले असताना.महसूल खाते हाताशी धरून काही समाजकंटक यांनी या जमिनीचे गैरव्यवहार करून काही व्यक्तींनी सदर पैकी 13 एकर जमीन व्ही.एन.एस ला विकली याठिकाणी व्ही.एन.एस चे सचिन भोसले व पाटर्नर यांनी "गोविंद पार्क" या नावाचा रहिवासी प्रकल्प ग्रीन झोन जमिनीत तयार करून नगर विकास विभागाची भूखंड पडण्याची परवानगी न घेता केला बेकायदेशीर व नियमबाह्यपणे भूखंड विक्री केली आहे. यासर्वास संबंधित जबाबदार अधिकारी, खरेदीदार, विक्रीदार, शिल्पा जवक उपअधीक्षक भूमी अभिलेख फलटण, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी  यांच्यावर फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 82 चे उल्लंघन करण्यात आले आहे, तसेच तुकडा जोड तुकडा बंदी कायद्याचे ही उल्लंघन करण्यात आले आहे यामुळे जिल्हाधिकारी सातारा यांनी 23/9/2021 रोजी आदेश काढून सर्वे न 20 "गोविंद पार्क" चे प्रकल्प मधील प्लॉट रद्द केले आहेत सदर जमिनीमध्ये नियमबाह्य प्लॉट घेतलेल्या लोकांची कोट्यवधीची फसवणूक या टोळीकडून झाल्याची खातरजमा झाली आहे फलटण च्या महसूल विभागात व मोजणी विभागातील दलाल व राजकीय बगलबच्चे यांचा सहभाग वाढला असून अशा प्रकारचे उपद्रवी प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या प्रकरणी न्यायालयात व महसूल विभागात संबधित अधिकारी व जबाबदार व्यक्ती यांच्या विरोधात दाद मागता आहोत. 

 सर्वे नंबर 20 बाबत आजअखेर अनेक विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या असून याबाबत ही स्वतंत्र तपास होणे गरजेचे आहे. अद्याप मागील तक्रारीवर महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची स्वतंत्र चौकशी अथवा कार्यवाही होत नसल्याने नक्की या प्रकरणी कोठे पाणी मुरत आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. सदर जमीनचा 32 ग झाला आहे असे समजून आम्ही गप्प बसलो होतो परंतु कोणत्याही दलालास अथवा अधिकाऱ्यास आम्ही पाठीशी घालणार नसून सदर मालमत्ता आमच्याच मालकीची असल्याची खात्री पटली आहे गैरकारभार करणाऱ्या व्यक्तींनी टायटल सिद्ध करावा 32 ग न झाल्याची बाब नुकतीच आमच्या लक्षात आली आहे. अशा प्रकारे खोटी कागदपत्रे करणाऱ्या व्यक्तीच्या व  जबाबदार अधिकारी यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहोत असे यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

भूखंड खरेदी केलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता 

सर्वे नं 20 "गोविंद पार्क" चे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असून श्रीमंत रघुनाथराजे यांनी या सर्वे नं 20 मधील प्रकल्पात आजून काही लोकांनी फसू नये असे सांगितले "गोविंद पार्क" बाबत सलग दुसऱ्या दिवशी खुद्द श्रीमंत रघुनाथराजे यांनी पत्रकार परिषद घेतल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकल्पात भूखंड खरेदी केलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Post a Comment

0 Comments