सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण
तालुक्याच्या
पुर्व भागातील पवारवाडी ते आसू रस्त्यालगत सुतारवस्ती नजीक अर्धवट
वापरलेल्या सलाईन, औषधे आणि दवाखान्यातील वेस्टजचा मोठ्या प्रमाणावर टाकाऊ
साठा आढळून आला आहे. सदरच्या वापरून झालेल्या औषधाची कोणत्याही प्रकारची
विल्हेवाट न लावता बेवारसपणे टाकून देण्यात आला आहे. हा संशयास्पद प्रकार
पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथील नागरिकांच्या
आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
देशासह
राज्यावर कोरोना महामारीचे संकट ओढवेल असताना पवारवाडी (आसू) ता. फलटण
येथील सुतारवस्ती नजीक दवाखान्यात वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन, सलाईन,
औषधे अश्या वेस्टज वस्तू बेवारसपणे टाकून देण्यात आल्या आहेत. सदरचे मेडिकल
वेस्टज खाजगी दवाखाना की सरकारी दवाखाना यांनी हे असे उघड्यावर टाकले हे
अद्याप स्पष्ट झाले नाही.
दरम्यान
पवारवाडी येथे अवघ्या ५०० मीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.
मात्र या आरोग्य केंद्राचे या अशा आरोग्यास हानिकारक मेडिकल वेस्टजकडे
कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने दिसून येत आहे. त्यामुळे या बेजबाबदार
पणे फेकून देण्यात आलेल्या बेवारस इंजेक्शन, सलाईन आणि औषधे कोणी टाकली
याचा त्यावरील कंपनी व बॅच नंबर वरून शोध घेणे गरजेचे आहे.
सद्या
दिवाळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात येत
असतात. ग्रामीण भागात लहान मुले किल्ल्यावर इंजेक्शन, सलाईन आशा वस्तूंचा
वापर करत असल्याने अशा उघड्यावर टाकण्यात आलेल्या मेडिकल वेस्टजमुळे अनेक
लहान मुलांसह कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे या अशा बेजबाबदार पणाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाने विल्हेवाट लावण्याची मागणी !
आसू-पवारवाडी
रस्त्यालगत सुतारवस्ती येथे फेकून देण्यात आलेल्या बेवारस इंजेक्शन,औषधे,
सलाईनमुळे लहान मुलांसह नागरीकांच्या आरोग्याचा मोठ्या प्रमाणावर धोका
असल्याने संबंधित आरोग्य विभागाकडून याची विल्हेवाट लावण्याची मागणी
ग्रामस्थांमधून होत आहे.
0 Comments