कारने उडवली दुचाकी चिमुरडी बचावली, आठवडाभरात दुसरा अपघात
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी/गोंदवले:
दहिवडी बिदाल रस्त्यावर शेरेवाडी ओढ्यावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गोंदवले येथील बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला. इस्टीम कारने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील चिमुरडी बचावली. अविनाश जाधव (वय 18) व त्यांची बहीण शुभांगी जाधव (वय 23, दोघे. रा. गोंदवले, ता. माण) अशी मृतांची नावे आहेत.
या बाबत घटनास्थळावरुन व पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गोंदवले येथील अविनाश जाधव व शुभांगी पाटोळे हे दहिवडी येथील वीटभट्टीवर काम करीत होते. सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास बिदाल येथे कामाचे पैसे आणण्याकरीता हिरो होंडा दुचाकीवरून ते निघाले होते. सोबत शुभांगी यांची लहान मुलगीही होती.
दहिवडी वरुन बिदालकडे जात असताना शेरेवाडी येथील ओड्याशेजारी समोरून आलेल्या इस्टीम कारने जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बहीण-भाऊ जागीच ठार झाले तर त्यांच्या सोबत असणारी पाटोळे यांची मुलगी गंभीर जखमी झाली ही घटना घडल्या नंतर बिदाल येथील ग्रामापंचायतीच्या रुग्णवाहिने सरकारी दवाखान्यात नेले मात्र डाक्टरांनी तेथे मृत घोषीत केले. या दोघांच्या मृत्युने गोंदवले येथे हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली असून सहायक निरीक्षक संतोष तासगावकर तपास करीत आहेत.
आठवड्यातच दुसरा अपघात
गेल्याच आठवड्यात फलटण रस्त्यावर ट्रक आणि स्वीफ्ट कारच्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेचे दु:ख ताजे असतानाच सोमवारच्या अपघाताने ‘त्या’ अपघाताच्या स्मृती जाग्या झाल्या. दोन युवकांपाठोपाठ बहीण भावाच्या अशा मृत्युने समाजमन मात्र हळहळले.
0 Comments