पाटण/प्रतिनिधी
पाटण तालुक्यामध्ये सोसायटी निवडणूकांनी चांगलेचं मैदान तापवले
आहे. स्थानिक नेते मंडळी कंबर कसून या निवडणूकांत लक्ष देत आहेत. बेलवडे
खुर्द ता पाटण या सोसायटी मध्ये शिवसेना/मनसे यांचें अकरा उमेदवार विजयी
झालेले आहेत. अनेक वर्षानंतर बेलवडे सोसायटी मध्ये सत्तांतर झाल्याने
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
बेलवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्या. बेलवडे खुर्द
यांच्या संचालक मंडळाची सन २०२२-२७ची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. गेली
अनेक वर्षे बेलवडे सोसायटी वरती राष्ट्रवादी पक्षाची सत्ता होती. वीस वर्षे
एकहाती राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व बेलवडे सोसायटी वरती होते.
शिवसेना आणि मनसे यांनी संयुक्त युती करुन बेलजाईदेवी
परिवर्तन पँनेल उभे केले. या पँनेलच्या माध्यमातून बारा उमेदवार निवडणूक
रिंगणात प्रत्यक्ष लढतीमध्ये होते. यामध्ये शिवसेनेचे सात उमेदवार तर मनसे
चे चार उमेदवार होते. राष्ट्रवादी चे बारा उमेदवार होते.
बुधवारी झालेल्या निवडणूकिमध्ये लोकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद
देऊन मतदान केले. तद्नंतर लगेचचं मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणी मध्ये
शिवसेना आणि मनसेचे अकरा उमेदवार निवडून आले.
शिवसेनेचे आठ पैकी सात उमेदवार निवडणूक निवडून आले. तर मनसे चार च्या
चार उमेदवार निवडून आले. शिवसेनेचे पवार आनंदा विष्णू, पवार बंडू नथुराम,
पवार राजाराम श्रीपती, पवार राजेंद्र निवृत्ती, पाटील अलका बंडु, सोनार
शामराव रामचंद्र, कांबळे गोविंद गणपती हे विजयी उमेदवार तर मनसेचे मरळी
विभाग प्रमुख पवार हणमंत खाशाबा, बेलवडे शाखा अध्यक्ष पवार अधिक यशवंत, कवर
यशवंत केशव, सौ. पवार विजया बबन हे मनसेचे उमेदवार निवडून आले.
जि प सदस्य विजय नाना पवार व तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या
नेतृत्वाखाली हे पँनेल विजयी झाले. यावेळी दिनकर पवार, हेमंत पवार, शरद
पवार, आबासो पवार, यशवंत पवार, अनिल पवार, मोहन पवार, सुनिल पाटील , मारुती
पवार , शंकर पवार, अशोक पवार यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. विजयी
उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
0 Comments