महाबळेश्वर शहर व परिसरात सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळण्यास सुरवात झाली. साधारणपणे तासभर विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाबरोबर गारा देखील पडल्या. या पावसामुळे स्थानिकांसह पर्यटकांची देखील चांगलीच तारांबळ उडालेची पहायला मिळाली.
आज सकाळ पासूनच उकाडा जाणवत होता त्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता होतीच. सकाळ पासून निरभ्र असलेले आकाश दुपारच्या वेळी काळवंडून आले. चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता निर्माण झालेल्या पावसाने हुलकावणी दिली परंतु, सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. साधारण एक ते दीड तास कोसळत पावसाने विश्रांती घेतली.
आज झालेल्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या महाबळेश्वर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना या उकड्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment