घरात घुसून मारहाण केल्यामुळे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, April 28, 2022

घरात घुसून मारहाण केल्यामुळे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


 पाच जणांवर गुन्हा दाखल

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
गोंदवले : नरवणे ( ता. माण ) येथे पूर्वीच्या जुन्या वादाचा राग मनात धरून युवकास पंकज सुदाम फडतरे व पत्नी रंजना पंकज फडतरे व संतोष सुदाम फडतरे अन्य दोघांनी मिळून युवक नितीन माने याला त्याच्या राहते घरी जाऊन घरी जाऊन मारहाण केल्यामुळे हाताश झालेल्या नितीन अशोक माने या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत केल्याप्रकरणी दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
         
नितीन अशोक माने हा युवक मुंबई येथे रंगकाम करत होता. गावातील सचिन काटकर या मित्राच्या लग्नासाठी तो आठ दिवसापूर्वी गावाला आला होता. सटवाई मळा येथील वस्ती वर नितीन माने यांचे घर आहे. त्यांच्या बाजूलाच फडतरे कुटुंबीय राहत आहे राहत आहे. नितीन हा मोटर बंद करण्यासाठी विहिरीकडे चालला असताना रंजना फडतरे या महिलेने जुन्या वादाचा राग मनामध्ये धरून त्याला शिवीगाळ करत त्याच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली. या मारहाणीत नितीन माने व रंजना फडतरे या दोघांनाही दुखापत झाली होती. त्या संबंधी दहिवडी पोलीस ठाणे मध्ये परस्परविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल झालेली तक्रार आपापसात समझोता करून मिटविण्यात आली होती..
       
त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास रंजना फडतरे यांचे पती पंकज फडतरे आल्यानंतर झालेल्या प्रकाराचा राग मनामध्ये धरून भाऊ संतोष आणि अन्य दोघांच्या मदतीने घरात घुसून नितीन ला मारहाण करण्यात आली..
 नितीन हा अतिशय शांत संयमी आणि हळव्या मनाचा असल्याने झालेली मारहाण अपमानास्पद होती. ती सहन न झाल्याने नितीनने lसायंकाळी वडाची विहीर या परिसरामध्ये वडाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले सदर घडलेल्या प्रकरणाची तक्रार नितीनचा भाऊ सागर माने याने दहिवडी पोलीस ठाणे मध्ये दिली..
 सदर प्रकरणाचा पुढील तपास दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर साहेब करत आहे....

No comments:

Post a Comment