बिजवडी ता.माण येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे आणी सध्या बिजवडीत यात्राकाळ सुरु असलेने मुंबई,पुणे तसेच बाहेरगावी कामानिमित्त असले बिजवडी नागरिकांची मोठी वर्दळ दिसून येत असतानाच पाण्याची वणवण पाहता शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी स्वखर्चाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी मागणी व विनंती करताच ताबडतोब दररोज टॅंकरच्या दोन खेपा बिजवडीला टाकण्याचे मान्य करत आजचपासून पाणी सुरु करुन जनतेच्या अडचणीची सोडवणूक केली आहे.
शासकीय नियमावलीत अपूरी कागदपत्रे तसेच स्थानिक प्रशासनान ग्रामसेवक यांचे चुकीचे धोरणांमुळे शासकीय टॅकर मिळण्यास अवधी लागत असलेमुळेच जनतेची गैरसोय पाहता आणी उगाच मोकळ्या भिम गर्जना करत बसण्यापेक्षा जनतेसाठी लगेच पुढे येणारा पक्ष म्हणजे शिवसेना आणी आजही शेखर गोरेंच्या दातृत्वाने पाणी .देऊन ते सिध्द केले आहे असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी म्हटले आहे
Saturday, April 30, 2022
शेखर गोरे यांचे कडून बिजवडीत पाण्याच्या टॅंकरच्या दोन खेपा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment