औंध प्रतिनिधी
सोमवार दि. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजणेच्या सुमारास औंधनजीक असलेल्या गोपूज ता. खटाव गावचे हद्दीत औंधमधील रहिवासी असलेल्या रामदास अशोक दंडवते या 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी औंध पोलीसांना घटनेची माहिती कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ आरोपीचा शोध घेत खरशींगे गावातील रोहन मल्हारी मदणे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गुरुराज दत्तात्रय मदणे या आरोपीचा शोध सुरू आहे
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोपूज नजीकच्या सुतार खडवी नावाचे परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली. त्यावेळी या परिसरात मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर तरुणाचा मृतदेह पाहता ओळख पटविणे कठीण होते मात्र औंध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटवत सदर मृतदेह कोणाचा आहे व तो या परिसरात कसा आला याची शहानिशा करण्याचे काम तात्काळ सुरू केले. रोहन मदणे व गुरुराज मदणे, दोघेही रा. खरशींगे यांनी संगनमताने रामदास दंडवते याचा खून केल्याची तक्रार लीला दंडवते यांनी केली आहे. रोहन मदणे या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तर गुरुराज मदणे या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अधिकचा तपास औंध पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. मते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
No comments:
Post a Comment