कुसुंबी प्रतिनिधीसुवर्ण
महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण ग्रामपंचायत मंत्रालय भारत
सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन
आयोजित जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती जावली यांच्या संयुक्त
विद्यमाने ग्रामीण रुग्णालय मेढा येथे दिनांक १८ एप्रिल रोजी तालुकास्तरीय
आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय
येथून देण्यात आली. सोमवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आरोग्य शिबिर
घेण्यात येणार आहे .या शिबिरात सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत, या
ठिकाणी डिजिटल हेल्थ आय.डी .आयुष्यमान भारत कार्ड मिळणार आहे.यासाठी दोन
फोटो, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, सोबत मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती
आणाव्यात.
मेळाव्यात विशेष तज्ञ डॉ. मार्फत आरोग्य
तपासणी करण्यात येणार आहे .तरी गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे
आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
0 Comments