सत्य सह्याद्री/गोंदवले
वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने स्वीफ्ट कार पुलावरून बंधार्यात कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. गोंदवले खुर्द ता माण जवळ रविवारी दुपारी हा अपघात झाला.अपघातातील सर्वजण सोलापूर येथील आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोलापूर येथील बसवराज महादेव झुरळे (वय 27) हणमंत सुखदेव रुपनवर (वय 52), आप्पासाहेब नामदेव काळे (वय 51) वैजनाथ तुकाराम काळे (वय 41) हे स्वीप्ट कारने देवदर्शनासाठी निघाले होते.
गोंदवले खुर्द पासून पुढे आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलावरून थेट बंधार्यात पाण्यात पडली. यामध्ये हणमंत सुखदेव रुपनवर, आप्पासाहेेब नामदेव काळे, वैजनाथ तुकाराम काळे 41 हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान या रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची मालिका सुरू आहे गेल्या मंगळवारी याच परिसरात अपघात होऊन तीन तरुण जागेवरच ठार झाले होते.यापूर्वीही गोंदवले बुद्रुक ते लोधवडे या अंतरात अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
0 Comments