सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शेंद्रे: ग्वाल्हेर-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री कर्हाडकडे जाणार्या मार्गिकेवर भरतगाववाडी गावचे हद्दीत दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात दुचाकी वरील युवक जागीच ठार झाला आहे. तुळजाराम आप्पासाहेब कोळी (वय 28 वर्ष रा.नांदगाव ता.सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सातारा बाजूने कर्हाडकडे जाणार्या मार्गिकेवर भरतगाववाडी गावचे हद्दीतील राजमार्ग हॉटेलचे समोरून हा युवक भरधाव वेगाने बेदकरकारपणे बुलेट दुचाकी घेऊन जात असताना पुढे जाणार्या एका अज्ञात वाहनास त्याने जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, त्यामध्ये तो स्वतः जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे विजय देसाई, प्रकाश वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून त्यास पुढील कामकाजासाठी नागठाणे आरोग्य केंद्रात पाठवले. घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार विजय देसाई करत आहेत.


0 Comments