फलटण
क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने विनयभंग केल्या प्रकरणी एका मुलाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.22 रोजी 12:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी ही सायकलवरून क्लासकरीता महात्मा फुले चौक ,तहसिलदार कार्यालय , डी एड चौक अशी जात असताना डीएड चौक फलटण येथील फळांच्या दुकानाजवळ आल्यावर तुषार सुर्यकांत मुळीक (रा.महाराजा मंगल कार्यालयाजवळ फलटण ता फलटण) हा मोटार सायकलवरून पाठलाग करून अल्पवयीन मुलगी थांबली असता तिला तु कुठे राहतेस व तु कोणत्या शाळेत जातेस असे विचारले तीने त्यास मला नाही माहित असे सांगुन ती क्लासमध्ये निघुन गेली. दोन दिवस संशयीत आरोपी तुषार हा सतत अल्पवयीन मुलीच्या सायकलचा मोटार सायकलवरून पाठलाग करत होता. पिडीत मुलगी हिने सदरचा प्रकार क्लासमध्ये गेल्यावर शिक्षकांना व फिर्यादीस सांगितला.
अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने विनयभंग केल्याप्रकरणी तुषार सुर्यकांत मुळीक याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

0 Comments