Hot Posts

6/recent/ticker-posts

माण तालुक्यात गुणवत्ता म्हणजे शैक्षणिक विकास: लक्ष्मण पिसे

सत्य सयाद्री न्यूज नेटवर्क
कुकुडवाड:
माण तालुक्यातील प्राथमिक शाळासह माध्यमिक शाळातून विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकास झाला पाहिजे मात्र विद्यार्थी गुणवत्ता महत्वाची असल्याचे प्रतिपदन शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी केले.

मार्डी येथे मार्डी बीट मधील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सुविचार सभेत बोलत होते.  
पिसे साहेब पुढे म्हणाले माणबुदधीवंताचा तालुका असून माण मध्ये कार्यरत असणारे शिक्षक दर्जेदार अध्यापना बरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित नेहमी. इयता पाचवी व आठवी  शिष्यवृत्ती साठी नियोजनबद्ध काम करावे असे आवाहन त्यांनी केले.मार्डी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक गंबरे  यांनी  शिक्षकांनी प्रत्येक मुलांच्या मानसिकतेचा विचार करावा असे आवाहन केले.मार्डी केंद्राचे केन्द्र संचालक  विजयकुमार शिंदे  यांनी प्रास्ताविक केले.केन्द्र प्रमुख यांच्या हस्ते विस्तार अधिकारी पिसे साहेब यांचा सत्कार व स्वागत केले.या सुविचार सभेला मार्डी बीटचे सर्व प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता मोरे मॅडम यांनी केले तर आभार महेंद्र हजारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments