मार्डी येथे 9 लाखांचा गांजा पकडला - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, September 29, 2022

मार्डी येथे 9 लाखांचा गांजा पकडला

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले :
दहिवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सपोनि अक्षय सोनवणे यांनी पहिल्याच बॉलवर षटकार मारत दोन नंबर वाल्यांच्या विरोधात धमाकेदार कारवाई करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.यामुळे  दहिवडी परिसरासह दोन नंबरचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
          माणमधील मार्डी येथे पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मकेसारख्या पिकात गांजा लागवड करून त्याची  विक्री करत असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे दहिवडी पोलिसांनी वेशांतर करून गुडघाभर चिखलात घुसून सदर शेतात छापा टाकला. सदर छाप्यात दहिवडी पोलिसांनी दहिवडी पोलीस ठाण्याच्या इतिहासातील आजपर्यंतची गांजा विक्री विरोधात सर्वात मोठी कारवाई करत राहुल तुकाराम गायकवाड वय- सुमारे २३वर्षे याच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे.सदर कारवाईत सपोनि अक्षय सोनवणे यांनी कारवाई करत ०९लाख ०९ हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला.
           सदर घटनेची सविस्तर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे यांचेसह संजय केंगले, प्रकाश हांगे,नीलम रासकर,आदी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सरकारी पंच म्हणून नायब तहसीलदार इवरे,मंडल अधिकारी खेडेकर,तलाठी योगेश अभंग,इत्यादींनी काम पाहिले.

  गांजाविरोधी कारवाईतील आरोपी आणि मुद्देमालासह उपस्थित सपोनि अक्षय सोनवणे व दहिवडी पोलीस...
           (छायाचित्र : नवनाथ भिसे )

No comments:

Post a Comment