सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
सातारा :
दहिवडी पोलीस स्टेशनला पदभार स्वीकारल्यानंतर सपोनि अक्षय सोनवणे यांनी दहिवडीसह परिसरातील दोन नंबरच्या धंद्यांना चांगलाच दणका द्यायला सुरुवात केलीय.त्याच अनुषंगाने दहिवडी पोलिसांनी अशीच एक धडक कारवाई करत गोंदवल्यात जुगार अड्ड्यावर मोठा छापा टाकला असून या छाप्यात पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता,त्याठिकाणी अनिकेत यादव(वय-३३वर्षे),शिवाजी सोनवणे वय-५७वर्षे,विशाल रणपिसे वय-३५वर्षे,हेमंत पवार वय-३५वर्षे,दादा कट्टे वय-५३वर्षे,मधुकर सोनवणे वय-६०वर्षे,रामचंद्र अवघडे वय-४४वर्षे,दत्तात्रय रणपिसे वय-४२वर्षे,अमोल माने वय-३०वर्षे,संदीप पाटील वय-४२वर्षे,शिवाजी रणपिसे वय-६३वर्षे,सर्व रा. गोंदवले बु। हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी त्यांच्याकडून पत्त्याची पाने,रोख रक्कम १६,२४०रुपये, तर १लाख ९२हजार रुपये किंमतीचे तब्बल ११ मोबाईल,चार मोटार सायकली,जुगाराचे साहित्य असा एकूण ३लाख ५८हजार २४०रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.
यावेळी जुगार खेळणाऱ्या सर्व व्यक्तींसह जुगार अड्डाचालक राहुल रणपिसे व चित्रसेन मुके सर्व रा.गोंदवले बु।यांच्याविरोधात
दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.२३२/२०२२ महाराष्ट्र नुसार अधिनियम कलम४,५,१२(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एम. दोलताडे करत आहेत.
ही कारवाई मा. अजयकुमार बन्सल पोलीस अध्यक्षक सो.सातारा, मा. अजित बोऱ्हाडे अप्पर पोलीस अधीक्षक सातारा. यांच्या सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे यांनी पोलीस हवालदार डी.के.भिसे,पोलीस नाईक एस. टी.अभंग,आर. पी. खाडे,पी. बी.कदम,वाय.आर.मोरे,पोलीस कॉन्स्टेबल जी. बी. खाडे यांच्या मदतीने केली.
No comments:
Post a Comment