फलटण:- सोमंथळी ता. फलटण येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात पाण्याचा अंदाज न आल्याने इर्टिका गाडी बुडाली. यामध्ये पिता-पुत्रीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय आज स्थानिक ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली माण तालुक्यातील वारूगड येथील छगन मदने आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी प्रांजल मदने यांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, छगन मदने हे सोमंथळी ता फलटण येथील त्यांचे सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी सोमंथळी येथे रात्री उशिरा येत होते. सोमंथळी - सस्तेवाडी या रस्त्यावर असणार्या ओढ्याला काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पुलावरून पाणी वाहत असल्याने या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वारूगड ता माण येथील छगन मदने(वय३८) व त्याची मुलगी प्रांजल मदने (वय १३) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. छगन मदने लष्करात सेवा करीत होते. सुट्टी निमित्ताने ते सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी आले होते. पुरात वाहून गेल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ग्रामस्थ व जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. छगन मदने व त्यांची मुलगी प्रांजल मदने यांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
No comments:
Post a Comment