सत्य सह्याद्री/ फलटण
कोळकी, ता. फलटण येथील महाबँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास एटीएममध्ये घुसलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी तेथील लॉबी कॅमेरा हलवून त्यानंतर मोशन सेन्सर व एटीएममधील कॅमेर्यांची वायर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सूरज दिनकर साळुंखे यांनी फिर्याद दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक केनेकर करत आहेत. दरम्यान, गेल्या 15 दिवसात जिल्ह्यात भुरट्या तसेच घरफोटी चोर्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नव्या अधीक्षकांनी आता हारतुरे बंद करून अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे.
Monday, October 31, 2022
Home
Unlabelled
कोळकीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
कोळकीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
About सत्य सह्याद्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment