सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: देवेंद्र फडणवीस हे आदर्श आणि प्रामाणिक नेते असून त्यांचे भविष्य पंतप्रधान होण्याचे आहे, असे भाकीत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले.
सातारा येथे बुधवारी आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पंडित अतुल शास्त्री भगरे होते.
या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नीलेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शिंदे सरकार स्थिर राहणार असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांना साडेसाती असल्याचे सांगितले. याचाच धागा पकडत महेश शिंदे यांनी वरील भविष्यवाणी केली.
या कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी धर्म, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मतही मांडले.
कार्यक्रमास राज्यभरातील ज्योतिष, पौरोहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत.
No comments:
Post a Comment