मलवडीत मटक्यानंतर अवैध दारू विक्रीवर धाड - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, November 12, 2022

मलवडीत मटक्यानंतर अवैध दारू विक्रीवर धाड


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले : दहिवडी पोलिसांची अवैध धंद्यांवरील कारवाई अद्यापही सुरूच असुन मलवडी येथे मटक्याच्या छाप्यानंतर अवैध दारू विक्रीवर अचानक धाड टाकून दारूविक्री करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  सदर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्याच्या ताब्यातील जुन्या सीडी व्हिडिओ प्लेयरमध्ये आतील सर्व इलेक्ट्रॉनिक साधन काढून चौकोनी साच्यात दारू विक्रीसाठी भरून ठेवली होती.पहिल्यांदा पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आली नाही,मात्र पोलिसांच्या नजरेतून आजपर्यंत सहसा गुन्हेगार सुटत नाही,याप्रमाणे तो साच्या पोलिसांच्या शोध नजरेने ओळखला असता त्यामध्ये विक्रीसाठी ठेवलेली दारू मिळून आली.
  जवळपास अर्धा तास सर्च ऑपरेशन चालु असताना देखील दारू सापडत नसल्याने पोलीस संभ्रमात होते.यावेळी अचानक जुन्या सीडी प्लेयरकडे पोलिसांचे लक्ष गेले.इतक्या वर्षाचा जुना सीडी प्लेयर ठेवण्याचे कारण विचारताना संशयितांच्या उत्तरांनी पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे हा गुन्हा दहिवडी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून चुकला नाही. यावेळी आरोपीकडून ५०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर सदर इसमाने गुन्हा कबूल केला.अवैध दारू विक्रीविरोधात यावेळी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    सदर कारवाई जिल्हापोलिस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे,एएसआय देवानंद तुपे हवालदार केंगले,बनसोडे,महिला पोलीस मोरे आदींनी केली.
 ऊस वाहतूकदारांवर देखील कारवाई,६९००रुपयांच्या दंडाची कारवाई
रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने दहिवडी पोलीस स्टेशन तर्फे ऊस ट्रॅक्टर यांच्यावर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याच्या अनुषंगाने रिफ्लेक्टर न लावणे, ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावून गाडी चालवणे, तसेच भरधाव वेगात आणि हलगर्जीपणाने ट्रॅक्टर चालवणे अशा १५ केसेस करून ६९०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला असून ०४ ऊस ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

छायाचित्र : 
   मलवडी ता.माण येथील अवैध दारूविक्री प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपीसमवेत सपोनि अक्षय सोनवणे, देवानंद तुपे व आदी...

No comments:

Post a Comment