माण तालुक्यात प्रथमच सांबराचे दर्शन - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, November 15, 2022

माण तालुक्यात प्रथमच सांबराचे दर्शन

छायाचित्र :-
 गोंदवले बु.ता.माण,या ठिकाणी काळविटाच्या प्रजातीतील सांबर या प्राण्याचे तालुक्यात प्रथमच दर्शन झाले. (छाया : नवनाथ भिसे )

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
गोंदवले : 
 गोंदवले बु। ता.माण येथे सातारा -पंढरपूर रोडलगत असणाऱ्या श्रीराम मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्याजवळ सांबर या वन्य प्राण्याचे दर्शन झाल्याने सर्वजण चकित झाले.
      स्थानिक लोकांकडून मिळालेल्या इतिवृत्तानुसार सुरुवातीला हे सांबर माणगंगा नदीच्या बाजूने दिलीप कट्टे सर यांच्या घराजवळून मुख्य रस्त्यावर आले. त्यानंतर ते रस्ता ओलांडून ते ओढ्याच्या पात्राकडे धावत गेले. आधी हा प्राणी बघताना लोकांना तो काळवीट असल्याचे जाणवले, परंतु वनाधिकारी यांच्याकडे सदर प्राण्याबाबत विचारणा केली असता ते त्याच प्रजातीतील काळवीट नसून सांबर असल्याचे उघड झाले.
    यावेळी त्याला कुत्र्यांनी त्याला भुंकून घाबरवून पळवून लावले.कुत्र्यांच्या पाठलागामुळे घाबरल्याने ते पळत जावून ओढ्या पात्राकडेच्या असलेल्या गर्द झाडीत दिसेनासे झाले.
     ही गोष्ट वन विभागाला कळताच वनविभागाचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले,त्यांनी ही सदर ठिकाणी शोधशोध केली पण त्यांना सांबर दिसून आले नाही.

त्याला इजा करू नका
सदर आढळलेला प्राणी हा काळवीट नसून तो त्याच प्रजातीतील दुसरा अर्थात सांबर हा प्राणी असून तो पूर्णतः निरुपद्रवी आहे.त्याला कुणीही आढळून आल्यास इजा पोहचवण्याचा प्रयत्न करू नका.आढळून आल्यास वनविभागाला कळवा.
  - मारुती मुळे
    वनपरिक्षेत्रअधिकारी,माण.

निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप वन्य प्राण्यांचा अधिवास हिरावतोय!
    जागतिकीकरण अन स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व सिद्ध करताना मानव निसर्गास असंतुलित करत आहे.वाढत्या वृक्षतोडीमुळेच हे वन्य प्राणी आपला अधिवास नाहीसा झाल्याने मानवी वस्तीकडे धाव घेताहेत.त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे होय.

No comments:

Post a Comment