फलटण येथे कोल्हा वन खात्याकडून जेरबंद - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, November 3, 2022

फलटण येथे कोल्हा वन खात्याकडून जेरबंद

 


फलटण :- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आसलेल्या पवार गल्ली फलटण येथे अनेक दिवसापासून वावरत असलेला  वन्यप्राणी कोल्हा रेस्क्यू करून वन खात्याने त्याला जेरबंद केले.
 याबाबत माहिती अशी की फलटण येथील श्री जबरेश्वर मंदिर नजीक पवार गल्ली येथे पंकज पवार यांचे वाड्याजवळ अनेक दिवसापासून वन्यप्राणी कोल्हा याचा वावर असल्याचे नागरिकांना आढळून आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
 या बाबत वन खात्याला अवगत केल्यानंतर  मोहिते DCF सातारा रेश्मा व्होरकाटे ACF व सचिन रघतवान वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतो वन परिमंडळ अधिकारी राजेंद्र कुंभार, सारिका लवांडे वनरक्षक फलटण तात्काळ वन कर्मचारी WLPRS प्राणी मित्र  सचिन जाधव, अभिजीत निकाळजे TEAM RESQ  बारामतीचे श्रेयश कांबळे, ऋषी मोरे व पंकज पवार, अतुल जाधव, साकेत अहिवळे, महेश धंगेकर, बाप्पूराव फरांदे, कुंडलिक मदने यांच्या सहकार्याने दुपारी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोल्हा वन्य प्राणी सुखरूप रेस्क्यू करण्यात आला वन विभाग फलटण यांचे वैद्यकीय तपासणी नंतर कोणतीही दुखापत नसल्याचे खात्री करून सदर वन्य प्राणी कोल्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.

No comments:

Post a Comment