मायणी : येथील कलेढोण रस्त्यावरील सागर पवार यांच्या वीटभट्टीनजीक भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सोमनाथ शिवाजी मदने (वय 38 रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) याचा जागीच मृत्यू झाला. मदने हा कलेढोणकडून मायणीकडे येत असताना पडळ कारखान्याकडे निघालेल्या उसाच्या रिकाम्या ट्रकला चुकीच्या बाजूकडे मदनेच्या दुचाकीची धडक बसली. यात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर भीतीने ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पोलीस पाटील प्रशांत सुरेश काळी यांनी फिर्याद दिली. मदने याच्याविरोधात स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारंडे करत आहेत.
No comments:
Post a Comment