फलटण प्रतिनिधी:- सराफ दुकानातील १० लाख ८० हजार रुपयांची रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी गेलेला कामगारानेच लुटीचा बनाव केल्याची घटना घडली असून फलटण शहर पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवून केवळ चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा लावला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१ रोजी १०.४५ वाजण्याच्या सुमारास या गुन्ह्यातील फिर्यादी सनि हनमंत इंगळे (वय 32 वर्ष, रा आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण ता. फलटण जि सातारा) शांतीकाका सराफ या ज्वेलर्स फलटण या दुकानातील रोख कॅश रुपये १० लाख ८० हजार रुपये ही बँकेत भरणा करण्यासाठी दुचाकीच्या गाडीच्या डिकीत पैसे ठेवून जात असताना राजवैभव लक्ष्मीनगर येथे दुचाकीवरून सायकलवरुन आलेले दोन अज्ञात व्यक्तींनी येवून "तुला लय माज आला आहे काय" असे म्हणुन कोयत्याने डोक्यात मारुन फिर्यादी यास गंभीर दुखापत करुन गाडीच्या डिकीमधील १० लाख ८० हजार रुपये रोख रक्कम जबरी चोरी करुन पळुन गेले अशी फिर्याद फिर्यादी यांनी दिलेल्या खबरवरुन फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास फलटण शहर पोलीस सहा. पोलीस निरीक्षक नितीन केनेकर यांच्याकडे देण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखवून गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस अधिक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी गुन्हयाचे तपासाकामी तपासी अधिकारी तसेच तपास पथक यांना मार्गदर्शन केले होते. वरीष्ठाचे मार्गदर्शनाखाली तपासपथक यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तसेच मोबाईल सी.डी.आर यांचे तांत्रीक विश्लेश्षन करुन गुन्हयातील साक्षीदार यांच्याकडे तपास करण्यात आला असता तपासादरम्यान यातील फिर्यादी यांनी दिलेली फिर्याद व घटनास्थळ परिस्थीती तसेच प्राप्त सीसीटीव्ही फुटेज यांचे तपासणी करत असताना फिर्यादी विसंगत माहीत देत असल्याचे व गुन्हयाचा बनाव करत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. त्यादरम्यान यातील फिर्यादी यांने सदरचा गुन्हा घडल्याचे बनाव केल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेज चे वेळ व फिर्यादी यांना झालेल्या जखमा यावरुन प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने यातील फिर्यादी यांचा संशय आल्याने सदर फिर्यादी यांचा डिसचार्ज झाल्यानंतर सदर फिर्यादी यांचे कडे तपास पथकाने अंत्यत कौशल्यपूर्ण व कसोसिने तपास करुन सदरचा गुन्हा घडला नसल्याचे व फिर्यादी यांना सदर गुन्हयाचा बनाव केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असुन सदरचा बनाव हा फिर्यादीचे मुलीला असलेल्या कॅन्सचे उपचाराकरीता पैशाची आवश्यकता असल्याने सदरचा बनाव केल्याचे तपासामध्ये निश्पन्न झालेले आहे. सदर आरोपी यांस सदर गुन्ह्यांत अटक करुन संशयीत आरोपी याच्याकडे कसोशिने व कौशल्यपूर्ण तपास करुन यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेली रक्कम रुपये ८ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण शहर पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, सहा. पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पो. उपनिरीक्षक शिंदे , पोलीस उपनिरीक्षक
दिपाली गायकवाड , स.फौजदार कदम, पो. हवा काळुखे, पो हवा चाडकर, पो. ना. जगताप, पो.ना लावंड, पो.ना. तांबे, पो.ना.मुळीक, पो.ना दडस, पो. ना कर्पे, पो.कॉ मेगावडे, पो.कॉ सांडगे, पो.कॉ घोरपडे, पो.कॉ कर्णे, पो.कॉ नाळे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडील पो.उप.नि, आरगडे, पो.ना काशीद, पो.कॉ जगदाळेयांनी सदर कारवाई मध्ये भाग घेतला आहे.
No comments:
Post a Comment