पिडीत महिलेस मिळाले हक्काचे घर - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, November 8, 2022

पिडीत महिलेस मिळाले हक्काचे घर

शेखर  कदम
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
क्षेत्र महाबळेश्वर:
कौटुंबिक हिंसाचार्यापासून महिलांच्या सरंक्षण कायदा 2005 अंतर्गत महाबळेश्वर येथील न्यायालयाने योगिता या पीडीत महिलेस पाचगणी ता.महाबळेश्वर जि सातारा येथे तात्पुरता निवासाकरिता आदेश पारीत केले होते.त्याअनुषंगाने सदर पिडीत महिलेस दि.15/10/2022 रोजी सदर सरंक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीने सदर आदेशाची बजावणी करण्यात आली.
सदर पिडीत महिलेस तिचे हक्काचे घर मिळवून देण्यात आले आहे.यावेळी या आदेशाची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष संरक्षण अधिकारी अविनाश रोहिटे , सहाय्यक संरक्षण अधिकारी संतोष गायकवाड , पोलिस कॉ.नितेश भोसले यांचेदेखील सहकार्य लाभले.तसेच एखाद्या महिलेचा कौटुंबिक छळ होत असेल तर सदर पिडीत महिलेने संरक्षण अधिकारी कार्यालय,पंचायत समिती आवारात संपर्क साधावा संरक्षण अधिकारी पिडीत महिलेस मा.न्यायालयात केस दाखल करण्यासाठी योग्य मदत करतील असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment