Hot Posts

6/recent/ticker-posts

कलेढाणला शेततळ्यात बुडून बालिकेचा मृत्यू

सत्य सह्याद्री/मायणी
कलेढोण, ता. खटाव येथे शेतातील तळ्यात बुडून उषा पांडुरंग भोये या नऊ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत झाला. रविवारी 5 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
मृत उषाही शेतातील तळ्यातील पाण्यात पडल्यानंतर तिचा मामा ज्ञानेश्‍वर शिवराम दरोडे (रा. कलेढोण) व विलास अंतु नायकवडी (रा. कलेढोण) या दोघांनी विटा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. ती नेमकी तळ्यात कशी पडली याबाबत माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून तपास पोलीस नाईक साळुंखे करत आहेत.

Post a Comment

0 Comments