Hot Posts

6/recent/ticker-posts

दुधेबावीत पॉलिशच्या बहाण्याने 45 हजारांचे दागिने लंपास

सत्य सह्याद्री/फलटण
दुधेबावी, ता. फलटण येथे दोघा अज्ञातांनी पॉलिशच्या बहाण्याने 45 हजारांचे दागिने लंपास केले. याबाबत सुवर्णा श्रीरंग चांगण (वय 38) यांनी फिर्याद दिली.
सोमवारी होळीदिवशी दुपारी दोनच्या सुमारास चांगण या नळावर पाणी भरत असताना दोन अनोळखी इसम दुचाकीवरून आले. आमच्याकडे भांडी पॉलीश करण्याची पावडर आहे. तुमचे दागिने व भांडी आम्ही पॉलिश करून देतो, असे सांगून त्यांनी चांगण यांचा विश्‍वास संपादन केला व त्यानंतर हातचलाखीने 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, त्यामध्ये 35 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या असलेले मण्यांचे गंठण असे 45 हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
याबाबत दि. 10 रोजी चांगण यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास उपनिरीक्षक घोंगडे करत आहेत.

Post a Comment

0 Comments