Hot Posts

6/recent/ticker-posts

सव्वातीन लाखांचे दागिने हडपणार्‍यावर गुन्हा

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा :
महिलेचा विश्‍वास संपादन करून वेळोवेळी तिच्याकडून सुमारे सव्वातीन लाखांचे दागिने हडप केल्याप्रकरणी शुभम प्रमोद पवार (रा. भैरवनाथ मंदिर रोड, साईबाबा मंदिराजवळ गोडोली, सातारा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वैष्णवी पंकज जावळे (रा. बजाज कॉलनी, क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली.
याबाबात माहिती अशी, ऑगस्ट 2022 ते 10 मार्च दरम्यान, शुभम याने वैष्णवी यांचा ओळखीतून विश्‍वास संपादन करून वेळोवेळी त्याला आर्थिक अडचण असल्याचे सांगून तब्बल तीन लाख 18 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने नेले. यामध्ये 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, 150 ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट, अशा दागिन्यांचा समावेश आहे.
हे दागिने वैष्णवी यांनी परत मागितल्यानंतर शुभमने त्यास नकार दिला. तसेच परत फोन केलास तर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.

Post a Comment

0 Comments