करंडी येथे सालाबाद प्रमाणे रविवार दि. ९ एप्रिल ते शनिवार दि. १५ एप्रिल अखेर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची या पारायण सोहळ्याची सुरुवात आज कलश पूजनाने करण्यात आली.कलश पूजन करंडी गावचे जेष्ठ ग्रामस्थ ह भ प सुभाष श्रीरग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कलश पूजनासाठी गावातील ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ ,वारकरी मंडळ, भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलश पूजन करण्यासाठी करंडी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून दिंडी निघाली दिंडीमध्ये ध्वज ,पताका ,विणा, टाळ, मृदंग ,कलश, तुळशी वृंदावना सह दिंडी गावच्या पाणी पिण्याच्या विहिरीवरून पूजन करून गंगा मातेची ओटी व पुष्पमाला अर्पण करून गंगा मातेची आरती करून कलश पाण्याने भरून गावातील सर्व ग्रामदैवतांची पान विडा नारळ व पुष्पमाला अर्पण करून त्या देवांना नमस्कार करून कलश मंदिरासमोरील पारायण मंडळाच्या मंडपामध्ये आणण्यात आला नंतर कलशाचे पूजन करून ज्ञानेश्वरी ग्रंथ, विणा पूजन, तुलसी पूजन, संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराजांचे व श्री संत रामदास स्वामी फोटोला पुष्पमाला अर्पण करून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करून पारायण सोहळ्याची सुरुवात झाली. या पारायण सोहळ्यामध्ये शिवाजीराव जगताप, जयवंतराव जाधव, मकरंद देशमुख ,संतोष दिनकर जाधव, प्रकाश कुलकर्णी ,शिवाजीराव देशमुख यांचे प्रवचन सेवा होईल व ह भ प शंकर मोरे महाराज बावधन धनश्री लोहार रामचंद्र कदम डबेवाडी, रवी महाराज लोहार ,क्षेत्र करंडी ,संतोष ढाणे पाडळी' डॉ.सुहास फडतरे कोरेगाव कुमठे, व सोमनाथ गायकवाड यांची कीर्तन सेवा होईल .या पारायण सोहळ्यामध्ये दररोज सकाळी ४ ते ६ काकड आरती ,८ ते ११,व ३ ते ५, ज्ञानेश्वरी वाचन ५.
ते ६ प्रवचन सेवा
सायंकाळी ६ ते ७.३० ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था करंडी येथील
विद्यार्थी वृंदाचा हरिपाठ कार्यक्रम होईल. रात्री ९ ते ११कीर्तन सेवा, ११
ते २ हरिजागराचा कार्यक्रम होईल .दि १४रोजी सायंकाळी सात वाजता दीपोत्सव व
सत्कार समारंभ होईल यामध्ये सापते दादा (अध्यक्ष )श्रीपती माने आबा,
सातारा वारकरी संघटना सातारा, घोडके सोा(पी.आय) महागडे सोा (सातारा तालुका
पोलीस स्टेशन) भीमराव शिरगावकर (नि.पी.आय)' धनंजय जांभळे (भाऊ) कर्नल
राजेंद्र जाधव ,कॅप्टन गोरखनाथ जाधव ,ह भ प दत्तात्रय महाराज कदम फलटण श्री
शशिकांत किसनराव जाधव (सरपंच )करंडी मंदाकिनी भोसले (उपसरपंच ) सुनीता
सोहन जाधव (पोलीस पाटील) करंडी हे उपस्थित राहतील दि.१५ रोजी काल्याचा
महाप्रसाद सर्व कुंभार परिवार करंडी यांच्यावतीने होईल या कार्यक्रमाच्या
वेळी साहेबराव चव्हाण, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव जगताप ,जयवंतराव जाधव,
(विणेकरी ), संजय जाधव (मृदंग मनी) प्रकाश कुलकर्णी ,संतोष सु जाधव, लहूराज
जाधव रमाकांत जाधव, शंकरराव जाधव ,बाळकृष्ण जाधव ,शामराव जाधव ,अंकुश
भोसले ,अनुसया निकम ,गंगुबाई जाधव ,सरुताई खेचरे, प्रतीक्षा जाधव, सरूताई
कुंभार ,निर्मला किर्दत, सुभाष आप्पा ,संपतराव जाधव (अण्णा) सोमनाथ जाधव
संभाजी जाधव हे ग्रामस्थ उपस्थित होते

0 Comments