Hot Posts

6/recent/ticker-posts

शाहूपुरीत वृद्ध दाम्पत्याला 3 लाखांचा गंडा

पोलीस असल्याच्या बहाण्याने लूट

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शाहूपुरी:
येथील आयुर्वेदीय अर्कशाळेच्या अलीकडे असलेल्या पुलावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला दोघा अनोळखी चोरट्यांनी पोलीस असल्याच्या बहाण्याने तब्बल तीन लाखांची लूट केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत माहिती अशी, येथील फिर्यादी स्मिता सुरेश देशपांडे (वय 71) रा. प्लॉट नं. 6, कल्पतरु, कोटेश्‍वर कॉलनी अर्कशाळेसमोर, बोधे हॉस्पिटलच्या मागे) या व त्यांचे पती सुरेश देशपांडे हे गुरुवारी 18 सकाळी  8 च्या सुमारास मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना अर्कशाळेच्या अलीकडील पुलावर दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे सांगून ओळखपत्र दाखवले. आमची गाडी पुढे उभी आहे. तुम्ही अंगावर दागिने घालू नका. दागिने घातले तर आमचे पोलीस तुम्हाला दंड करतील, असे सांगून स्मिता यांच्या हातातील 2 लाख 50 हजार रुपय किंमतीच्या 5 तोळे वजनाच्या दोन पाटल्या व 50 हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र काढायला लावले. ते कागदात गुंडाळून पती सुरेश यांच्या पिशवीत ठेवून हातचलाखीने दागिने लांबवले.
घरी आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्ष आल्यानंतर शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. तपास हवालदार फडतरे करत आहेत.
पोलीस नेमकं काय करतात?
काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारे फसवणूक करणारी टोळी पकडल्याचा ढोल सातारा पोलीस दलाने पिटले होते.  वृत्तपत्रात याबाबात बातम्याही छापून आल्या होत्या. मात्र, बातमी आल्यादिवशीच फलटण त्यानंतर सलग वडूज, सातारा येथे घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांचा फोलपणा समोर आला आहे. पोलीस नेमकं करतात काय? असा प्रश्‍न उपस्थित होत असून या घटनांना आळा घालण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन करण्याची गरज आहे. अधीक्षक समीर शेख यांनी आता स्वत:च या प्रश्‍नी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments