Hot Posts

6/recent/ticker-posts

अश्विनी शेंडगे खटाव - माण च्या नव्या डीवायएसपी

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले :माण खटावच्या उपविभागीय अधिकारी पदी अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती झाली आहे. माण खटावचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर तासगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या अश्विनी शेंडगे यांची माण खटावच्या उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दुष्काळी पट्ट्यातील झरे (ता.आटपाडी)च्या येथील असणाऱ्या अश्विनी शेंडगे यांनी २०१५ साली एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्या परीक्षेला बसू शकल्या नव्हत्या. नाउमेद न होता त्यांनी २०१६ साली परत एकदा एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला व पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. २०१७ साली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती स्वीकारत भंडारा जिल्हयात दर्जेदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी आपला ठसा उमटवला. तद्नंतर त्या सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. या ठिकाणी असलेल्या अनेक अवैध धंद्यांना त्यांनी आळा घालत त्या लेडी सिंघम असल्याचे सिद्ध केले. 
महाराष्ट्र राज्यातील बदलीच्या सत्रात त्यांची माण खटावच्या उपविभागीय पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. डॉ.नीलेश देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments