सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले :संभाजीनगर शाळेतील महिला शिक्षकेंनी अधिकाऱ्यांना चौकशी अंती दिला चक्क खोटा अहवाल
दोन्ही शिक्षिका गैरहजर, शाळा बंद तरीही कागदोपत्री उपस्थिती दर्शवल्याने अधिकारी ही चक्रावले . ही घटना आहे माण तालुक्यातील गोंदवले केंद्रातील संभाजीनगर येथील प्राथमिक शाळेतील दोन शिक्षिकेनी ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीला हरताळ फासला होता या बाबत वृत्त प्रसिद्ध झालं होतं त्या वृत्ताची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत संबंधीत शिक्षीकांना या बाबत खुलासा मागविण्यात आला होता मात्र 6 जूनला गैरहजर रहात शासकीय आदेशाची पायमल्ली करून सुध्दा आहवल खोटा देत अधिकाऱ्यांच्या ही डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रयत्न केल्यानं संपूर्ण माण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे
संबंधीत महिला शिक्षकांच्या वर शिक्षण विभागाणे नक्की काय कारवाई केली याचा आढावा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी श्री महादेव राऊत यांच्या कडे जाऊन घेतला असता खूप धक्कादायक माहिती समोर आली ती अशी सत्य सह्याद्री ने दिलेल्या वृतानुसार त्या दोन्ही महिला शिक्षकेना याबाबत खुलासा मागविण्यात आला होता त्यांनी ही चक्क 6 मे रोजी शाळा न उघडता गैरहजर राहत राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी न करता ही दिलेल्या खुलाशात आम्ही 6 मे रोजी शाळा उघडली होती राजर्षी शाहू पुण्यतिथी साजरी केल्याचे फोटोग्राफ आणि त्यावेळी मुलांचे पालक उपस्थित असल्याच्या पालकांच्या सह्या घेऊन आम्ही सगळा कार्यक्रम साजरा केला असल्याचा अहवला माननीय गटशिक्षणाधिकारी श्री राऊत याना सादर केला मात्र त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी सदर अहवाल असमाधान कारक असल्याचे कारण देत तो अहवाल पुढं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर करून टाकला आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी श्री महादेव राऊत यांनी दिली यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गंबरे हे ही उपस्थित होते
0 Comments