Hot Posts

6/recent/ticker-posts

औंध परिसरात वादळी पावसाने नुकसान


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध: मंगळवार दि. 9 मे रोजी दुपारी 3 वाजता औंधसह आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक वारे सुटले आणि जोरदार पाऊस झाला. अर्धा तास चाललेल्या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. अनेक दिवसांची औंधकरांची पावसाची प्रतीक्षा आज संपली. वडूज, खटाव, पुसेगाव भागात उन्हाळी पाऊस झाले मात्र औंध वंचितच होते. गेले अनेक दिवस औंधच्या आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडत होता आणि औंधवासी मात्र पावसाच्या प्रतिक्षेत होते, आता ह्या पावसाने औंधवासी काही प्रमाणात सुखावले असले तरी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments