Hot Posts

6/recent/ticker-posts

औंध पोलिसांच्या कारभारावर नाराजी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध: परिसरात सुसाट दुचाकीमुळे नुकताच झालेल्या अपघातात 5 जण किरकोळ व गंभीर अशा स्वरूपात जखमी झाले. मात्र अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने औंध पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुले वाहने सुसाट चालवतात व अशा परिस्थितीमध्ये गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असते. पोलिसांकडून अशा मुलांना ताकीद देऊन असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे असते. मात्र असे प्रबोधनात्मक कार्य न करता घटना घडल्यावर साधा गुन्हा सुद्धा नोंद होऊ नये असे प्रकार सध्या घडत आहेत.
  औंध मध्ये सुद्धा असाच प्रकार घडल्याचे सध्या समजत आहे. सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांनी आईस्क्रीम विक्रेत्या हातगाडी चालकाला पाठीमागून जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार चौघे अल्पवयीन मुले व हातगाडा चालक गंभीररित्या जखमी झाले आहेत.दि. 7 मे रोजी सायंकाळी घडलेल्या घटनेची पोलीस स्टेशनला दि. 8 मे रोजी रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. मागील महिन्यामध्ये पोलीस अधीक्षक सातारा यांचे कडून पुरस्कार विजेते औंध पोलीस स्टेशन अशा घटनेकडे डोळेझाक करत आहे का...? असा सवाल विचारला जात आहे.

Post a Comment

0 Comments