Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यपाल दौऱ्याने पर्यटक हैराण, सर्व ामान्यांच्या पोटावर पाय.


शेखर कदम
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर
राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे चार दिवस विश्रांती साठी महाबळेश्वर दौऱ्यावर आले असून त्यांच्या या दौऱ्यात प्रोटोकॉल प्रमाणे पोलिसांचा व शासकीय वाहणांचा मोठा फौज फाटा महाबळेश्वर आणि परिसरामध्ये तैनात करण्यात आला आह. यादरम्यान महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आणि स्थानिकांना राज्यपाल यांच्या दौऱ्याचा मोठा फटका बसताना दिसतोय.आधिच स्थानिकांना व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीसह ट्राफिकच्या समस्येचा सामना करावा लागत असून राज्यपालांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आलेल्या शासकीय वाहनांच्या व पोलीस फोजफाट्यामुळे तर पर्यटक चांगलेच हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. वेण्णालेक रस्त्यावर जागोजागी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटक व छोट्या मोठ्या व्यापा-यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.पोलीस यंत्रणेच्या ढिसाळ व आरेराविच्या कारभाराबाबत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
चौकट - राज्यपाल दौ-यामुळे स्थानिकांवर ओढवणार आर्थिक संकट..
पर्यटक देखील महाबळेश्वर मधून काढता पाय घेण्याची शक्यता....
पोलिसांच्या आरेरावीला आळा घालण्याची आवश्यकता....
 महाबळेश्वर मध्ये कोरोणा महामारी नंतर आता कोठे पर्यटनाला बहर येतोय त्यामुळे येथील हातावर पोट असलेल्या स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असतानाच राज्यापालांचा विश्रांतीसाठीचा दौरा असल्याने त्याचा परिणाम येथील वाहतूक कोंडी तसेच वेण्णा लेक व इतर पर्यटन स्थळांवर झाल्या शिवाय राहणार नाही.
कारण राज्यपाल महोदय येथील विविध पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्याने त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यपालांच्या ताफ्याला अडचण निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक रोखणे,गर्दी कमी करणे,रस्ता बंद ठेवणे असे पर्याय पोलिस प्रशासना कडून अवलंबिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि त्याचा परिणाम येथील पर्यटना बरोबरच येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करून आलेल्या पर्यटकांवर होणार असून त्यांना मोठा त्रास सहण करावा लागणार आणि त्याचा थेट परिणाम येथील छोटे मोठे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहावर होणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
कारण हेच हंगामातील काही शेवटचे दिवस आहेत ज्यामध्ये येथील हातावरच पोट असणाऱ्या लोकांना पुढील चार महिन्यांच्या उदरनिर्वाहा साठी आर्थिक तरतूद करुन ठेवावी लागते त्यामुळे राज्यपाल दौऱ्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागणार असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments