सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज
: वडूज, ता. खटाव येथे इंदिरानगर भज्याळवाडी येथील हणमंत राऊत यांच्या
प्रशांत ट्रेडर्स नावाच्या उघड्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या
जुगार अड्ड्यावर छापा मारून वडूज पोलिसांनी 8 जुगार्यांवर कारवाई केली.
यामध्ये अनेक बड्या धेंडांचा समावेश असून या कारवाईत 6 लाख 64 हजार 280
रुपये रोख, जुगाराचे साहित्य, सहा दुचाकी, एक चारचाकी गाडी व एक मोबाईल
जप्त करण्यात आला.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई
करण्यात आली. पोलिसांनी छापा मारताच एकच पळापळ झाली. पोलिसांनी सुधीर
नंदकुमार गोडसे (वय 27, रा. वडूज), नितीन भीमराव काळे (वय 34, रा. वडूज),
सलीम बादशहा शेख (वय 54, रा. वडूज), आनंदराव शिवाजीराव लावंड (वय 45, रा.
वडूज), बाळासाहेब रामचंद्र काळे (वय 44, रा. वडूज), संतोष रामचंद्र पवार
(वय 43, रा. वडूज), राहुल सुधाकर राऊत (वय 40, रा. वडूज), बनाजी दिनकर
पाटोळे (वय 43, रा. वडूज) यांच्यावर कारवाई केली. या सर्वांना सीआरपीसी 41
(1) (अ) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. तपास कॉन्स्टेबल. ए. एल. भोसले
करत आहेत.

0 Comments