सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मेढा : अवैध दारुविक्रीवर कारवाई न झाल्यास पालकमंत्र्यांना दारुच्या बाटल्या भेट देणार, असा आंदोलनाचा इशारा व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी देताच मेढा पोलीसांनी सुसाट छापेमारी करत एकाच दिवसात हद्दीतील पाच ठिकाणी बेकायदेशीर दारुविक्रीवर कारवाया करत तब्बल 7 हजार रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. या छापेमारीने मेढा पोलीस नेमके कोणाला घाबरले पालकमंत्री की विलासबाबा याची खुमासदार चर्चा जावली खोर्यात सुरु झाली आहे.
सोनगाव, ता. जावली हद्दीत प्रतापगड हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दारुविक्रीवर छापा मारून पोलिसांनी अभयसिंह राजेंद्र घोरपडे (वय 33, रा. कुडाळ, ता. जावली, मूळ रा. भाडळे, ता. कोरेगाव) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 1 हजार 470 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
कुडळ, ता. जावली येथे बोराटेवस्तीच्या पाठीमागे छापा मारून अतुल रमेश खटावकर (वय 56, रा. कुडाळ) याच्यावर कारवाई करून 1 हजार 540 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
भणंग, ता. जावली येथे मारुती मंदिराच्या आडोशाला छापा मारून मोहन नाथाब्बा सुतार (वय 55, रा. भणंग) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडू 2 हजार 450 रुपयांच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
करहर, ता. जावली येथे खर्शीबारामुरे रस्त्याच्या वखारीच्या आडोशाला छापा मारून बबन गणपत धनावडे (वय 65, रा. खर्शीबारामुरे) याच्यावर कारवाई करून 1 हजार 470 रुपयांच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
केळघर, ता. जावली हद्ीदत मध्यवर्ती बँकेच्या भिंतीच्या आडोशाला छापा मारून नितीन चंद्रकांत दळवी (वय 30, रा. केळघर) याच्यावर कारवाई करू 1 हजार 470 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
मेढ्याचे कारभारी काय करतात?
एकाच दिवसात पाच कारवाया केल्यामुळे मेढा पोलीस ठाणे हद्दीत दारुविक्री सुरु असल्याचा मुद्दा अधोरेखीत झाला असून मेढा पोलीस ठाण्याचे कारभारी नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरंतर येथील संतोष तासगावकर एक डॅशिंग अधिकारी असले तरी त्यांचा अवैध धंद्यांवरील वचक कमी झालाय की अन्य कोणते कारण आहे याबाबत जावली तालुक्यात चर्चा आहे.
0 Comments