Hot Posts

6/recent/ticker-posts

कोडोलीत भरदिवसा घरात घुसून लाखाची लूट

डिटर्जंटच्या बहाण्याने आलेल्या दोघा अज्ञातांचे कृत्य



 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा :  कोडोलीतील गणेश चौकात भरदिवसा घरात घुसून दोघा अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील 1 लाखांचे दागिने लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता घडली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सुजाता कृष्णराव चव्हाण (वय 48, रा. घर क्र. 4049, कृष्णकुंज, शिवाजीनगर, गणेश चौक कोडोली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी दुपारी सुजाता या घरातील किचनमध्ये काम करत असताना त्यांच्या वृद्ध आई कमल निवृत्ती कांबळे या सोफ्यावर कोथिंबीर निवडत बसल्या होत्या. त्यावेळी दारावर दोन अनोळखी इसम डिटर्जंट पावडर विक्रीचा बहाणा करीत घरात घुसले. कमल कांबळे यांच्या उजव्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, तसेच सुजाता यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र असा 1 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.  तपास उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.

Post a Comment

0 Comments