Hot Posts

6/recent/ticker-posts

बंद घरात आढळले चौघांचे मृतदेह

पाटण तालुक्यातील खळबळजनक घटना,दाम्पत्यासह मुलागा अन् मुलीचा समावेश


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

पाटण : पावसामुळे ग्रामीण भागातील दुर्गम क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना पाटण तालुक्यातील सणबूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह घरामध्ये शुक्रवारी सकाळी आढळून आलेले आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबियांमध्ये आई, वडील, अविवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी अशा सदस्यांचा समावेश आहे.

शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव (वय 70), पत्नी सुमन जाधव (वय 65), मुलगा संतोष जाधव (वय 45), विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मुद्रीळकोळे, ता. पाटण) अशी कुटुंबातील मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील सणबूर येथे गावापासून काही अंतरावर रुवले रस्त्यावर जाणार्‍या मार्गावर जाधव कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. या कुटुंबातील वडील आनंदा जाधव हे शिक्षक होते. वडील आनंदा जाधव काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर कराड येथे वैद्यकीय उपचार सुरु होते. दरम्यान, उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. राहत्या घरी ऑक्सिजची सुविधा देण्यात आली होती मात्र लाईट नसल्यामुळे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्या सोबत पत्नी, मुलागा, मुलगी असे चौघेजण होते.

पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस केली. सणबूर येथील संपूर्ण मधील घटना घडली ते घर एका आठ बाजूला आहे. पुन्हा शुक्रवारी सकाळी त्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही फोन उचलत नसल्याने शेजारी व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यात सांगितले. काही लोक घरी गेले असता त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून दरवाजा बंद होता व कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत पाहिली असता चारही जण अंथरुणावरून मृत अवस्थेत पडले पडलेले दिसले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यानंतर या घटनेची माहिती ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना ग्रामस्थांकडून देण्यात आली. 

दरम्यान, काही वेळेपूर्वी पोलीस अधिकारी कर्मचारी व डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. संबंधित जाधव कुटुंबीय गावापासून बाहेर राहत असल्यामुळे हा नेमका कोणत्यावेळी प्रकार घडला? या कुटुंबियातील सदस्यांचे एकचवेळी मृतदेह कसे काय आढळले? हि घटना म्हणजे आत्महत्या आहे कि काही घातपात झाला आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सध्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.

Post a Comment

0 Comments