Hot Posts

6/recent/ticker-posts

खिंडवाडीत बाजार समितीचे काम सुरु

सातारा: जेसीबीच्या सहाय्याने काम सुरु करण्यात आले तेव्हा सभापती विक्रम पवार यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: बहुचर्चित व वाद निर्माण झालेल्या खिंडवाडी, ता. सातारा येथील बाजार समितीच्या जागेवर उभारण्यात येणार्‍या व्यापारी संकुलाच्या कामास बुधवारी प्रारंभ करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नुकताच निकाल दिला आहे.
खिंडवाडी येथील 17 एकर जागा सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतल्यानंतर या जागेचा वाद जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत चालला होता. सर्वच न्यायालयात बाजार समितीच्या बाजूने निकाल लागल्याने गेल्या महिन्यात बाजार समितीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या उपस्थितीत करण्याचे जाहीर करण्यात आले होते. याचवेळी खासदार उदयनराजे भोसले, त्यांचे कार्यकर्ते व या जागेतील काही कूळ असलेल्या शेतकर्‍यांनी भूमिपूजनस्थळी दंगा घातला होता. तेथील काही साहित्याची मोडतोडही केली होती. त्याही गोंधळात आमदारांनी भूमिपूजन समारंभ उरकून घेतला होता. त्यावेळी हा वाद गाजला होता.
त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायायलयात याचिका दाखल केली. मात्र, ती फेटाळत न्यायालयाने उदयनराजेंना फटकारत झालेल्या नुकसानीची 2 लाख 10 हजारांची भरपाई करण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे आता हा वाद पूर्णपणे थांबला असून बुधवारी येथे कामाचा प्रारंभ करण्यात आला.

Post a Comment

0 Comments