पांगरी गावचं आदर्श व्यकीमत्व काळाच्या पडदयाआड
. अशा मनमिळाऊ दडस मॅनेजर यांचे मंगळवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता निधन झाले सावडण्याचा विधी गुरुवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी पांगरी येथे सकाळी आठ वाजता आहे
त्यांनी आजपर्यंत सरपंच पद ते मार्केट कमिटीचे संचालक ' सिद्धनाथ पतसंस्थेचे सरव्यवस्थापक , बिरोबा देवस्थान पांगरीचे ट्रस्टी 'संस्थापक चेअरमन राजमाता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी*
सचालक मार्केट कमिटी माण* संचालक खरेदी विक्री संघ माण
अध्यक्ष नेहरू युवा मंडळ पांगरी संचलित श्री बिरदेव बालक व प्राथमिक शाळा दहिवडी.
संचालक पांगरी विकास सेवा सोसायटी आदी पदांनवर काम पाहिले . तसेच धनगर समाजाचे आराध्य दैवत सतोबा देवस्थान टाकेवाडी येथे डोंगरावर पाणी ' लाईट व भक्तांना जाणे सोपे व्हावे म्हणून पायऱ्या चे काम त्यांनी केले तसेच पांगरी येथे भव्य बिरदेव सांस्कृतिक भवन बांधले त्यासाठी त्यांनी आपार कष्ट घेतले . त्यामुळे आज त्या ठिकाणी गोरगरीबांची लग्ने अल्प दरात होतात
त्यांची राजकीय सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील कारकीर्द इतरांना मार्गदर्शक ठरेल अशीच होती . ते पांगरी गावचे एक आदर्श व्यकीमत्त्व होते. डिग्री आणि शहानपण वेगळे असते याच उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रकांत दडस असं हे व्यक्तीमत्व..
शेतकरी, कष्टकरी, कुटूंबवत्सल तसेच शिक्षण ,राजकारण,सहकार, क्षेत्रातील उत्तम जाण पांगरी ग्रामस्थांना दिशा दर्शक, व मार्गदर्शक असा आधारवड वाटणारे, हजरजबाबी.एके काळी सिद्धनाथ संस्थेचे विश्वस्थ म्हणून नेटके व्यवस्थापन त्यांनी संभाळले. त्याच्यां पाश्चात पत्नी दोन विवाहित मुले व एक मुलगी सुना नातवांडे दोन भाऊ तीन पुतने असा परीवार आहे त्याच्यां अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शब्दांकन लालासाहेब दडस, दहिवडी सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
0 Comments